Google मध्ये, आम्हाला विश्वास असतो की लोक ऑनलाईन असतात तेव्हा, चांगल्या गोष्टी घडतात.

परंतु, जगामध्ये अद्याप असे अनेक लोक आहेत – जागतिक लोकसंख्येच्या दोन तृतियांश – ज्यांच्याकडे इंटरनेट नाही.

आणि त्यांच्यापैकी दोन तृतियांश महिला आहेत.

भारतामध्ये, केवळ 17% महिला ऑनलाईन असतात.

महिलांना त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी आणि इतर समुदायांच्या फायद्यासाठी इंटरनेटचा वापर करण्यासाठी खेड्यांमध्ये महिलांना सक्षम करुन ही दरी भरुन काढण्याचा निर्धार Google ने केला आहे. Google India ने टाटा ट्रस्ट्स सोबत भागिदारी करुन संपूर्ण भारतातील खेड्यांमधल्या महिलांना मूलभूत इंटरनेट कौशल्यं देऊन आणि त्यांना इंटरनेट-सक्षम उपकरणं पुरवून सज्ज करण्यासाठई इंटरनेट साथी उपक्रम सुरु केला आहे. हे साथी नंतर त्यांचे शेजारी आणि जवळच्या खेड्यांमधील महिलांना सरकारी योजना, आरोग्य आणि हवामान यासारख्या विषयांवर ऑनलाईन माहिती शोधण्यासाठई इंटरनेट सुविधा आणि वापर करण्याचं प्रशिक्षण देतील. या प्रशिक्षणातून शिक्षणाचं एक चक्र सुरु होईल, त्यामुळे संपूर्ण भारतातील युवा आणि ग्रामीण लोकसंख्येवर सकारात्मक परिणाम होईल.