वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तंत्रज्ञान अवघड असू शकते. काही सामान्य प्रश्नांची उत्तरं इथं दिली आहेत.

आपला मोबाईल सुरु करणे

माझा फोन का सुरु होत नाही?

या फोनची बॅटरी संपलेली आहे त्यामुळे तो सुरु होत नसेल. तुमचा फोन 10-15 मिनिटं चार्ज करा आणि पुन्हा स्विच ऑन करा. बॅटरीच्या चिन्हावर लाल खूण येण्यापूर्वी तुम्ही आपला फोन चार्ज केला पाहिजे.

सर्वसामान्य कृती

मी स्क्रिनचा प्रखरपणा कसा कमी करु शकते?

पुल-डाऊन मेन्यू वापरा आणि ब्राईटनेस पर्यायावर बोट ठेवा. तुमच्या गरजेनुसार ब्राईटनेस कमी करा.

मी फोनचा वॉल्युम कसा नियंत्रित करु?

साऊंडचा वॉल्युम नियंत्रित करण्यासाठी फोनच्या बाजूला असलेलं वॉल्युम कंट्रोल बटण दाबा. तुम्ही YouTube व्हिडीओंचा वॉल्युम नियंत्रित करण्यासाठी देखील या बटणाचा वापर करु शकता.

इंटरनेटशी जोडणे

माझे इंटरनेट का चालू नाही?

सेटिंग्जमध्ये जा आणि मोबाईल डाटावर बोट ठेवा. जर ते ऑफ असेल तर, तुमचे इंटरनेट चालू होणार नाही. ते ऑन करण्यासाठी त्यावर बोट दाबा.

माझे इंटरनेट दिवसातून अनेक वेळा बंद पडते. मी काय करावे?

काहीवेळेस इंटरनेटचा सिग्नल कमी असलेल्या जागेत तुम्ही असू शकाल. सिग्नल योग्य मिळत असलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा.

माझा डाटा पॅक मी कसा रिचार्ज करावा?

फोन डाटा रिचार्ज पॅक्स विकणाऱ्या एका दुकानात जा. तुम्ही ज्या सेवा पुरवठादाराची सेवा तुम्हाला घ्यायची आहे त्या पुरवठादाराचा डाटा पॅक विचारा. तुमच्या गरजेनुसार एक रिचार्ज पॅक खरेदी करा.

इंटरनेट वापरणे

वाय-फाय म्हणजे काय?

वाय-फाय म्हणजे एका विशिष्ट जागेपुरते मर्यादित एक बिनतारी इंटरनेट कनेक्शन, म्हणजे बरेचसे तुमच्या टेलिविजनच्या केबल ऑपरेटर्ससारखे. एखाद्या वाय-फाय कनेक्शनची रेंज एखाद्या भागापुरती मर्यादित असते. तुम्ही त्या भागामध्ये असता तेव्हा वाय-फाय द्वारे तुमच्या फोनवर तुम्ही इंटरनेटी जोडले जाऊ शकता.

मला Google सर्चद्वारे हवी असलेली माहिती मिळत नाही.

एखादा Google शोध उपयुक्त ठरण्यासाठी, तुमचा शोध निश्चित करण्यासाठी वापरले जाणारे शब्द नेमके असले पाहिजेत. शब्दांचे वर्णन जितके अचूक, तितके निष्कर्ष तुमच्या गरजेच्या जवळचे राहतील.

वॉईस रिसर्चमुळे मला हवे असलेले निष्कर्ष मिळत नाहीत. मी काय करु?

एखादा वॉईस रिसर्च परिणामकारक होण्यासाठी, तुम्हाला शक्य तितके स्पष्टपणे बोला. बोलत असताना तुम्ही अज्ञात आवाजांचा वापर होणार नाही याची खात्री करा. यामुळे तुमचा शोध शक्य तितका नेमका होण्यात तुम्हाला मदत मिळेल. सध्या, वॉईस सर्चवर केवळ इंग्लिश आणि हिंदी भाषेतील शोध उपलब्ध आहेत.

इंटरनेट वापरण्यासाठी किती खर्च येतो?

तुम्ही इंटरनेट वापरता तेव्हा, तुम्ही डाऊनलोड केलेल्या डाटासाठी तुम्हाला पैसे आकारले जातात. डाटा किती अवजड आहे त्यावर त्याची किंमत आधारित असते. टेक्स्ट डाऊनलोड करण्यासाठी डाटा शुल्क सर्वात कमी असते तर व्हिडिओज डाऊनलोड करताना अधिक खर्च येतो. ऍप्स, इमेजेस, कागदपत्रे आणि संगीत डाऊनलोड करण्यासाठी देखील डाटा शुल्क आकारले जाते.

मी Google सर्च वापरुन एखादी इमेज कशी शोधू शकते?

महत्वाचा शब्द टाईप करा आणि सर्चवर टॅप करा. तुम्हाला निष्कर्ष दिसतील. आता इमेजेसवर टॅप करा. Google तुम्हाला तुमच्या शोधाशी जुळणाऱ्या इमेजेस दाखवेल. तुम्ही अशाच प्रकारे व्हिडिओज आणि नकाशे देखील शोधू शकता.

.com, .in, .gov यासारख्या वेबसाईट एक्सटेन्शन्सचा अर्थ काय आहे?

.gov, .nic ने समाप्त होणाऱ्या साईट्स सरकारी मालकीच्या असतात आणि त्यावर सामान्यतः अचूक आणि विश्वासार्ह माहिती असते. .com सारखा विस्तार असलेल्या साईट सर्वसामान्य आहेत आणि त्या एखाद्या कंपनीच्या मालकीच्या असतात. .in या विस्ताराचा संबंध भारतातील एखाद्या कंपनीशी आहे.

ऍप्सच्या मूलभूत गोष्टी

माझ्या स्क्रिनवर खूप अनेक ऍप्स आहेत. मी ते कसे मांडू?

तुम्ही हे ऍप्स एका पानावरुन दुसऱ्या पानावर नेऊ शकता. असं करण्यासाठी, त्या ऍपवर थोडा वेळ बोटाने दाबा आणि त्याला तुमच्या फोनच्या कोपऱ्यातून ओढून न्या. तुमच्या फोनवर पुढील पान दिसेल जिथे तुम्ही हे ऍफ योग्य त्या ठिकाणी ठेवू शकता.

माझे ऍप बंद पडले आहे. मी काय करु?

खूप अनेक ऍप्स सक्रिय असताना असे होऊ शकते. अनावश्यक ऍप्स बंद करण्यासाठी ऍक्टिव ऍप्स वापरा आणि तुमचा फोन पुन्हा सुरु करा.

माझ्या फोनवर हे ऍप मला इन्स्टॉल करता येत नाही. मी काय करु?

तुमच्या फोनमध्ये पुरेशी मेमरी नसेल तर तुमची ऍप्स तुमच्या फोनवर इन्स्टॉल होऊ शकणार नाही. उपलब्ध मेमरीचा वापर करा. काही व्हिडिओज आणि छायाचित्रं डिलिट केल्यानं थोडी मेमरी मोकळी होईल आणि तुमची ऍप्स इन्स्टॉल करणं शक्य होईल. डिलिट होत असलेले फोटोज आणि व्हिडिओजचे विषय तपासून पाहा.

व्हिडीओ कॉलिंग

एक नेहमीचा मोबाईल-आधारित कॉल आणि Google Hangouts कॉल यामध्ये फरक काय आहे?

Google Hangouts कॉल मोफत आहे. तुम्ही कॉलच्या दरम्यान वापरलेल्या डाटासाठई केवळ आपण पैसे भरायचे आहेत.

इंटरनेट वापरणे

इंटरनेट सुरक्षित आहे का?

इंटरनेट हे प्रत्यक्ष जगाच्या सारखचे एक आभासी जग आहे. प्रत्यक्ष जगामध्ये तुम्ही घेता तशीच खबरदारी तुम्हाला या आभासी जगामध्ये घ्यावी लागते. इथं तुम्ही करणार असलेल्या काही कामांसाठी मजबूत पासवर्ड्स लागतात, ते तुम्ही कोणालाही सांगायचे नसतात आणि तुम्ही स्वतःला आणि तुमचा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी Google नं दिलेल्या पद्धती आणि माहिती वापरा.

एक मजबूत पासवर्ड म्हणजे काय?

एखाद्या कमकुवत पासवर्डमध्ये “पासवर्ड”, “12345678” यासारख्या सर्वसामान्य रचना किंवा सर्वसामान्य शब्द असतात. इतर लोक त्याचा गैरवापर करण्यासाठी सहजपणे अंदाज लावू शकतात. मजबूत पासवर्ड्समध्ये केवळ तुम्हाला माहिती असलेले शब्द असतात (जसे तुम्ही इयत्ता 4 थीत असताना शिकवणाऱ्या तुमच्या शिक्षकांचे नाव), जे इतर लोकांना अंदाज लावायला अवघड असतात आणि त्यामध्ये मुळाक्षरं आणि संख्या यांचं मिश्रण असतं.

मी एक मजबूत पासवर्ड कसा तयार करु?

केवळ तुम्हाला माहिती असलेली शब्दरचना वापरुन एक पासवर्ड तयार करा. मोठी आणि लहान अक्षरे, संख्या आणि चिन्हं वापरुन तुमचा पासवर्ड अंदाज लावण्यास अवघड असा बनवा. तुमचे पासवर्ड्स अन्य कोणालाही तुम्ही सांगणार नाही याची खात्री करा.

एका अनोळखी व्यक्तिनं मला अटॅचमेंटसोबत एक ईमेल पाठवला आहे. तो उघडणं सुरक्षित आहे का?

काही ईमेल्समध्ये तुमचा फोन किंवा तुमचा डाटाचं नुकसान होईल अशा अटॅचमेंट्स असतात. अनोळखी व्यक्तिंच्या ईमेल्स उघडणं टाळा. अटॅचमेंट्स उघडणं किंवा अशा ईमेल्समधील कोणत्याही लिंक्सवर टॅप करणं टाळा.

मला खूप मोठ्या रक्कमेचं बक्षीस देणारी एक ईमेल आली आहे. मी काय करु?

काही ईमेल्समध्ये अवास्तव आश्वासनं आणि तुमच्या वैयक्तिक माहितीच्या बदल्यात, म्हणजे तुमचं पूर्ण नाव, टेलिफोन क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि पिनसारखी माहिती देण्याच्या बदल्यात रोख बक्षीसं देऊ केलेली असतात. कोणाशीही वैयक्तिक माहिती देऊ नका आणि अशा ईमेल्स डिलीट करा.