1.तुमच्या फोनवर काही महत्वाचे आयकॉन्स आहेत. टिप: आयकॉनच्या जागा विविध फोन्सवर वेगवेगळ्या असतात. फोनच्या मूलभूत दिशादर्शनासाठी स्टोअरच्या मालकाला विचारा.

2.मेन्यू – मेन्यू उघडण्यासाठी या आयकॉनवर टॅप करा, जिथे तुमच्या फोनवर उपलब्ध आयकॉन्स दिलेली आहेत.

3.ऍक्टिव ऍप्स – तुमच्या फोनवरील सक्रिय ऍप्सची यादी पाहण्यासाठी या आयकॉनवर दीर्घ दाबा.

4.एखादे एक्टिव ऍप बंद करण्यासाठी, ‘X’ बटणावर टॅप करा. टिप: एक्टिव ऍप्स नियमितपणे बंद करणे महत्वाचे आहे अन्यथा तुमच्या फोनचा वेग मंद होईल.

5.बॅक – या आयकॉनवर टॅप केल्यानं तुम्ही आधी वापरत असलेलं पान, ऍप, किंवा फंक्शनकडे परत जाल.

6.होम – या आयकॉनवर टॅप केल्यानं तुम्ही परत होम स्क्रिनवर जाल.