1.बुकमार्किंगमुळे तुम्ही भेट दिलेल्या वेबसाईटची लिंक साठवली जाते आणि तुम्ही तिला परत भेट देऊ शकता.

2.Chrome ऍप ब्राऊज करण्यासाठी त्याला टॅप करा.

3.तुम्हाला बुकमार्क करण्यासाठी एखादी वेबसाईट सापडली, उदाहरणार्थ, रेल्वेचं वेळापत्रक, तर वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर टॅप करा.

4.मेन्यूवरील स्टार आयकॉन टॅप करा. ती वेबसाईट आता बुकमार्क झाली आहे. टिप: वेबसाईट बुकमार्क झाली आहे हे सूचित करण्यासाठी स्टारचा रंग बदलतो.

5.वेबसाईटला पुन्हा भेट देण्यासाठी, Chrome ऍप उघडल्यानंतर तीन डॉट्सवर टॅप करा.

6.बुकमार्क्सवर टॅप करा. तुम्ही बुकमार्क केलेल्या सर्व साईट्स तिथे दिसतील.

7.तुम्हाला भेट द्यायची आहे त्या वेबसाईटवर टॅप करा. उदाहरणार्थ, रेल्वे टाईमटेबलची वेबसाईट.

8.बुकमार्क काढून टाकण्यासाठी, तुमच्या बुकमार्क्सच्या यादीकडे जा आणि तुम्हाला काढून टाकायची आहे त्या वेबसाईटच्या शेजारील तीन डॉट्स टॅप करा.

9.या मेन्यूत तुम्हाला सिलेक्ट, एडिट, मूव किंवा डिलिट हे पर्याय मिळतील. डिलिट वर टॅप करा.