1.एखादा विशिष्ट पत्ता किंवा स्थानी पोहोचण्यासाठी Google Maps तुम्हाला मार्ग दाखवते.

2.Google Maps ऍपवर टॅप करा. टिप: तुम्ही इंटरनेटशी जोडलेले असल्याची खात्री करा.

3.तुम्ही Google Maps प्रथमच वापरत असाल तर, गुगल तुम्हाला लोकेशन सेवा सुरु करण्यास विचारेल. येस वर टॅप करा. टिप: तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन लोकेशन चालू किंवा बंद करण्यासाठी त्यावर टॅप करु शकता. लोकेशन सेवा ऑन केल्यानंतर तुम्हाला डाटाचा खर्च येईल.

4.सर्च बॉक्समध्ये जागा किंवा पत्ता टाईप करा. उदाहरणार्थ, ताज महल. सर्च आयकॉनवर टॅप करा. टिप: तुमचे सध्याचे लोकेशन निळा ठिपका स्वरुपात दिसेल.

5.Google तो पत्ता शोधेल, नकाशाचा तो भाग झूम इन करेल आणि एक लाल पिन स्वरुपात तो दाखवेल. तिथे जाण्याची दिशा पाहण्यासाठी निळ्या बटणावर टॅप करा.

6.तुम्ही तिथे कसे पोहोचाल ते बदलण्यासाठी ड्रायविंग, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन किंवा वॉकिंग आयकॉन्सवर टॅप करा. त्या ठिकाणी पोहण्यासाठी आवश्यक वेळ आणि ते किती दूर आहे (किलोमीटर्समध्ये) ते दिसेल.

7.तिथे पर्यायी मार्ग असतील तर ते ग्रे रंगानं दाखवले जातील. तुमच्या पसंतीच्या मार्गावर टॅप करा.

8.त्या मार्गावरील वाहतुक Google Maps तुम्हाला दाखवेल.

9.आवाजातून दिशा कळण्यासाठी स्टार्ट नेविगेशन आयकॉनवर टॅप करा. टिप: काहीवेळेस, Google Maps एखादी चूक करु शकते किवां उपलब्ध नसलेला मार्ग घेते. प्रवास करताना थोडी काळजी घ्या.