1.टाईप करण्यासाठी अधिक सोपं जावं आणि तुम्हाला हवी ती माहिती शोधण्यासाठी तुमच्या कीबोर्डची भाषा तुम्ही बदलू शकता. टिप: कीबोर्ड बदलण्याची पद्धत तुमच्याकडील फोननुसार भिन्न राहील. कृपया नेमक्या दिशांसाठी तुमच्या फोनची माहिती पुस्तिका पाहावी.

2.‘सेटिंग्स’ वर टॅप करा.

3.‘भाषा आणि इनपुट’ कडे स्क्रोल डाऊन करा.

4.‘भाषा आणि इनपुट’ वर टॅप करा.

5.‘कीबोर्ड आणि इनपुर मेथ्ड्स’ कडे स्क्रोल डाऊन करा.

6.‘Google Keyboard’ वर टॅप करा. टिप: तुमचा वर्तमान कीबोर्ड ‘English (US) – Google Keyboard’ असण्याची शक्यता आहे.

7.‘भाषा’ वर टॅप करा.

8.स्क्रोल डाऊन आणि तुमचा किबोर्ड ज्या भाषेत हवा आहे ती शोधा. तुम्हाला समाविष्ट करायची आहे त्या भाषेवर टॅप करा. टिप: या धड्यासाठी, आम्ही उदाहरण म्हणून हिंदी वापरली आहे.

9.‘भाषा आणि इनपुट’ स्क्रिनकडे परत येण्यासाठी बेक’ आयकॉनवर दोनवेळा टॅप करा.

10.नंतर, ‘करंट कीबोर्ड’ वर टॅप करा.

11.‘हिंदी – Google Keyboard’ वर टॅप करा.

12.तुमचा सध्याचा कीबोर्ड बदलून हिंदी होईल. तुम्ही सेटिंग्जमधून बाहेर येईपर्यंत ‘back’ आयकॉनवर टॅप करा. आता तुमचा कीबोर्ड हिंदी झाला पाहिजे.

13.जर कीबोर्ड अद्याप इंग्लिशमध्ये दिसत असेल तर, हिंदी किबोर्ड येईपर्यंत ‘globe’ आयकॉन टॅप करत राहा.