1.तुम्ही आपल्या फोनवरील भाषा बदलू शकता म्हणजे बहुतांश फंक्शन्स तुमच्या पसंतीच्या भाषेत दिसतील.

2.‘सेटिंग्स’ वर टॅप करा.

3.‘भाषा आणि इनपुट’ कडे स्क्रोल डाऊन करा.

4.‘भाषा आणि इनपुट’ टॅप करा. टिप: ‘भाषा आणि इनपुट’ साठी आयक़ॉन लक्षात ठेवा. समजा तुम्हाला समजत नाही अशा भाषेमध्ये चुकून तुमचा फोन बदलला तर, तुम्ही आयकॉन ओळखून केव्हाही ‘भाषा आणि इनपुट’ शोधू शकता.

5.“भाषा” वर टॅप करा

6.“भाषा जोडा” वर टॅप करा

7.तुम्हाला आवश्यक भाषा शोधेपर्यंत स्क्रोल डाऊन करा.

8.तुमच्या आवश्यक भाषेवर टॅप करा. टिप: सर्व भारतीय भाषा सध्या उपलब्ध आहेत.

9.आता, तुम्हाला हव्या त्या भाषेवर टॅप करा आणि बोट धरुन ठेवा, आणि तिला भाषांच्या यादीच्या वरती ओढून आणा.

10.आता तुमचा फोन या भाषेमध्ये कार्य करेल.

11.पण, ठराविक ऍप्स नेहमीच इंग्लिशमध्ये दिसतील. उदाहरणार्थ, Chrome आणि YouTube.