1.ऑन/ऑफ' बटण सामान्यतः तुमच्या फोनच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला असते.

2.तुमचा फोन ऑन करण्यासाठी, 'ऑन/ऑफ' बटण काही सेकंद दाबून धरा, त्यानंतर स्क्रिन उजळेल.

3.तुमचा फोन ऑफ करण्यासाठी ‘ऑन/ऑफ’ बटण काही सेकंद दाबून धरा. टिप: तुम्हाला फोन ऑफ करायचा आहे याची पुष्टि फोनद्वारे विचारली जाऊ शकते. शिवाय, काही फोन्समध्ये ‘पॉवर ऑफ’ खेरीज अन्य पर्यायांची एक यादी दाखवली जाते – तुमच्या फोनला ऑफ करण्यासाठी ‘पॉवर ऑफ’ वर अवश्य टॅप करा.