1.Play Store हे तुमच्या फोनवरील एक ऍप आहे जे एक ऍप बाजारपेठ म्हणून काम करते. तुम्हाला इथं सर्व प्रकारची ऍप्स मिळतील. टिप: काही ऍप्स मोफत डाऊनलोड करता येतात तर काहींसाठी पैसे द्यावे लागतात.

2.Play Store ऍपवर टॅप करा.

3.तुम्हाला सर्च फिल्डमध्ये डाऊनलोड करायचं आहे त्या ऍपचं नाव टाईप करा (उदाहरणार्थ, सरकारी नोकरी). सर्च आयकॉनवर टॅप करा.

4.तुम्हाल ऍप्सची एक यादी दिसेल. तुम्हाला जे डाऊनलोड करायचं आहे त्यावर टॅप करा. टिप: तुम्ही ऍपच्या नावाचं स्पेलिंग चुकीचं लिहिलं, किंवा त्या नावाचं एकही ऍप अस्तित्वात नसेल तर तुम्हाला काहीही निष्कर्ष दिसणार नाहीत.

5.ऍपचा तपशील दिसेल. तुमच्या फोनवर ते ऍप डाऊनलोड करणे सुरु करण्यासाठी ‘इन्स्टाल’ वर टॅप करा.

6.ऍप डाऊनलोड होऊ लागेल. तुम्ही त्याची प्रगती पाहू शकता.

7.डाऊनलोड पूर्ण झाला की, ऍपचा आयकॉन तुमच्या फोनवर दिसेल. टिप: डाऊनलोड केलेलं ऍप शोधण्यासाठी तुमच्या फोनवरच्या विविध पानांमधून तुम्हाला शोध घ्यावा लागेल.

8.ऍप उघडण्यासाठी त्यावर टॅप करा टिप: ऍप्स डाऊनलोड केल्यानं सामान्यतः खूप प्रमाणात डाटा वापरला जातो म्हणून आवश्यक नसेल ते डाऊनलोड करु नका. तसंच, तुम्ही वायफायशी जोडलेले असतानाच ऍप डाऊनलोड करा.