1.तुम्ही इंटरनेटवरुन तुमच्या फोनमध्ये फाईल्स साठवू शकता. टिप: याला डाऊनलोडींग फाईल्स असे देखील म्हणतात.

2.इंटरनेटवरुन एखादी इमेज साठवण्यासाठी, त्या इमेजवर दीर्घ दाब द्या. तुम्हाला पर्यायांची एक यादी दिसेल.

3.सेव इमेज या पर्यायावर टॅप करा.

4.तुमची फाईल साठवली जात आहे असे दाखवणारा डाऊनलोडींग हा शब्द दिसेल. पूर्ण झाल्यावर तुमच्या स्मार्टफोनवर ती इमेज पाहण्यासाठी ओपनवर टॅप करा.

5.सर्व डाऊनलोड इमेजेस पाहण्यासाठी डिवाईस फोल्डर्स वर टॅप करा.

6.इमेजेस असलेले विविध फोल्डर्स पाहण्यासाठी स्क्रोल करा.

7.त्या फोल्डरच्या आतील इमेजेस पाहण्यासाठी एखाद्या फोल्डरवर टॅप करा.