1.ईमेल्स पाठवण्यासाठी पैसे लागत नाहीत पण तुमच्या मोबाईल डाटामधील थोडा डाटा वापरला जातो.

2.Gmail ऍपवर टॅप करा.

3.साइन इन करण्यासाठी तुमचं युजरनेम आणि पासवर्ड भरा. नेक्स्ट टॅप करा टिप: तुम्ही आधीच साइन इन केले असेल तर हा क्रम आपोआप स्किप कराल.

4.ईमेल तयार करण्यासाठी पेन्सिल आयकॉनवर टॅप करा.

5.तुम्हाला ज्या व्यक्तिला ईमेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल पत्ता टू या रकान्यामध्ये टाईप करा. टिप: तुम्ही टू या रकान्यात अनेक ईमेल पत्ता समाविष्ट करु शकता.

6.हा ईमेल कशाबद्दल आहे ते सूचित करण्यासाठी विषयाच्या रकान्यात त्या ईमेलचा विषय टाईप करा.

7.तुम्हाला जो संदेश पाठवायचा आहे तो कॉम्पोज ईमेल रकान्यात टाईप करा.

8.तुमचा संदेश टाईप करुन झाल्यानंतर, सेंड आयकॉनवर टॅप करा. टिप: तुमचा ईमेल दिसतो आहे हे पाहण्यासाठी सेंट फोल्डर उघडून पाहा. जर तो तुम्हाला तिथं दिसत असेल, याचा अर्थ तो पाठवला गेला आहे.

9.. तुमचं Gmail ऍप काही कारणानं बंद झालं तर, तुमचा संदेश ड्राफ्ट्स फोल्डरमध्ये साठवला जाईल. हा फोल्डर उघडण्यासाठी मेन्यु आयकॉनवर टॅप करा.

10.ड्राफ्ट्सवर टॅप करा आणि तुम्हाला लिहिणे चालू ठेवायचे असेल त्या ईमेलवर टॅप करा.