1.तुम्ही फोटोज घेण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनचा वापर करु शकता.

2.कॅमेरा ऍपवर टॅप करा.

3.कॅमेऱ्याची दिशा निश्चित करा आणि शटर आयकॉनवर टॅप करा. टिप: फोटो घेत असताना फोनचा आवाज येतो.

4.तुम्ही थंबनेलवर टॅप करुन घेतलेला फोटो लगेच बघू शकता.

5.तुम्हाला फोटो काढून टाकायचा असेल तर ट्रॅश आयकॉनवर टॅप करा.

6.अधिक फोटोज घेण्यासाठी परत कॅमेऱ्याकडे जाण्याकरिता, बॅक आयकॉनवर टॅप करा.