1.तुमच्या फोनवर पुढील बाजूस (जिकडे स्क्रीन असतो) कॅमेरा असेल तर तुम्ही सेल्फी- स्वतःचाच फोटो घेऊ शकता.

2.कॅमेरा ऍपवर टॅप करा.

3.इनवर्ट कॅमेरा आयकॉनवर टॅप करा. आता स्क्रीनवर तुम्ही स्वतःला पाहाल. टिप: हा आयकॉन आणि त्याची जागा प्रत्येक फोनवर भिन्न असते. तुमच्या फोनवर तो कुठे आहे ते पाहण्यासाठी तुमच्या फोनची माहिती पुस्तिका वाचा.

4.शटर आयकॉनवर टॅप करा. टिप: फोटो घेतल्यानंतर फोनचा सामान्यतः आवाज येतो.

5.तुम्हाला फोटो काढून टाकायचा असेल तर, ट्रॅश आयकॉनवर टॅप करा.