1.तुम्ही Google Hangouts ऍप वापरुन तुमच्या संपर्क यादीवरील तुमचे कुटुंबिय आणि मित्रांसोबत चॅट करु शकता. हे चॅट टेक्स्ट, कॉल किंवा व्हिडिओद्वारे करता येते.

2.Hangouts ऍपवर टॅप करा.

3.यादीमधून ज्याच्याशी चॅट करायचं आहे त्या कॉन्टॅक्टचं नाव टॅप करा. ऑनलाईन कॉन्टॅक्ट्सच्या नावासमोर हिरवा ठिपका दिसेल.

4.कॉन्टॅक्टला टॅप केल्यानंतर चॅट विंडो उघडेल.

5.चॅट सुरु करण्यासाठी, संदेश टाईप करण्याकरिता कीबोर्ड वापरा. तुमचा संदेश टाईप करुन झाला की सेंड टॅप करा.

6.तुमचं चॅटिंग करुन झालं की तुमच्या कॉन्टॅक्ट यादीकडे परत जाण्यासाठी बॅक आयकॉनवर टॅप करा.