1.तुम्ही तुमचे व्हिडिओज कोणालाही पाहण्यासाठी YouTube वर अपलोड करु शकता.

2.YouTube ऍपवर टॅप करा. टिप: व्हिडिओज अपलोड करण्यासाठी तुम्ही आपल्या Gmail खात्यामध्ये साइन इन केले पाहिजे.

3.अकाऊंट आयकॉनवर टॅप करा.

4.अपलोड व्हिडिओ आयकॉन टॅप करा.

5.Photos ऍपमधून तुम्हाला जो व्हिडीओ अपलोड करायचा आहे तो टॅप करा. टिप: तुम्ही आपल्या स्मार्टफोनचा कॅमेरा वापरुन एक नवीन व्हिडिओ देखील रेकॉर्ड करु शकता.

6.त्याला शीर्षक द्या आणि दिलेल्या रकान्यांमध्ये तुम्ही त्या व्हिडिओचे वर्णन देखील करु शकता.

7.प्रायवसी रकान्यावर टॅप करा.

8.तुमचा व्हिडिओ कोण पाहू शकेल ते यादीमधून निवडा.

9.तुम्हाला व्हिडिओचा केवळ एक पार्ट अपलोड करायचा असेल तर, तुम्हाला हवा तो भाग निवडण्यासाठी निळे डॉट्स पुढे आणि मागे ओढा. तुमचं काम झालं की नेक्स्ट आयकॉनवर टॅप करा.

10.तुमचा व्हिडिओ आता अपलोडसाठी क्यू झाला आहे. तुम्ही अपलोड स्थिती आणि अपलोडसाठी शिल्लक वेळ पाहू शकता. टिप: व्हिडिओचा आकार आणि इंटरनेटचा आकार यानुसार तो अपलोड होण्यासाठी वेळ लागू शकतो. अपलोडच्या दरम्यान तुमचे कनेक्शन बंद पडले तर अपलोडला अडचण येते. व्हिडिओज अपलोडींसाठी तुमच्या मोबाईलचा खूप डाटा लागू शकतो.

11.तुम्ही आपल्या खात्यात साइन इन करुन आणि अकाऊंट सेक्शनमध्ये माय व्हिडिओज टॅप करुन कोणत्याही वेळी आपले व्हिडिओज पाहू शकता.