1.तुम्हाला पाठवण्यात आलेले ईमेल्स तुमच्या जीमेल इनबॉक्समध्ये असतील. तुमचा इनबॉक्स पाहण्यासाठी Gmail ऍपवर टॅप करा.

2.तुमचे न वाचलेले ईमेल्स ठळक अक्षरात दिसतील. ईमेल उघडण्यासाठी त्यावर टॅप करा.

3.त्या ईमेलला उत्तर देण्यासाठी, रिप्लाय वर टॅप करा. तुमचं उत्तर कॉम्पोज ईमेल विभागात टाईप करा.

4.जर तो ईमेल दोन किंवा अधिक लोकांना लिहिलेला असेल, आणि तुम्हाला त्या सर्वांना उत्तर द्यायचं असेल, तर तीन ठिपक्यांवर (ऍडिशनल ऑप्शन्स आयकॉन) वर टॅप करा, आणि रिप्लाय ऑलवर टॅप करा.

5.तुमचा संदेश टाईप करुन झाला की सेंड आयकॉनवर टॅप करा.

6.तुम्हाला एक नवीन ईमेल मिळेल तेव्हा, तुमचा फोन तुम्हाला त्याची माहिती देणारी एक सूचना पाठवेल. पुल डाऊन मेन्यू पाहण्यासाठी स्क्रिनवर स्वाईप करा. टिप: ही सूचना बीप किंवा लहान Gmail आयकॉन स्क्रिनच्या वरच्या बाजूस या स्वरुपात असेल. तुम्ही साइन इन केले असेल तरच तुम्हाला ही सूचना मिळेल.