1.व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही YouTube हे ऍप वापरु शकता. टिप: ऑनलाईन व्हिडिओज पाहण्यासाठी टेक्स्ट किंवा इमेजेस डाऊनलोड करण्यापेक्षा अधिक डाटा लागतो, म्हणून तुमच्या मोबाईल डाटा प्लानवर पुरेसा डाटा असल्याची खात्री करा.
3.शोध रकान्यात तुम्हाला शोधायचा आहे त्या व्हिडिओचं नाव टाईप करा (उदाहरणार्थ, ‘हलवासाठी रेसिपि’). सर्च आयकॉनवर टॅप करा.
4.तुमच्या शोधाशी जुळणाऱ्या निष्कर्षांची एक यादी तुम्हाला दिसेल. व्हिडिओ थंबनेल किंवा नावावर टॅप करुन ते उघडा.
5.व्हिडिओवर कुठेही टॅप करण्याने पॉज, मूव फॉरवर्ड किंवा बॅक, किंवा फुल स्क्रिन जाण्याकरिता कंट्रोल्स दिसतील. प्लेबॅक स्लायडर आणि प्लेबॅक स्टेटस देखील दिसतील.
6.नेक्स्ट’ आयकन टॅप करण्याने शोध यादीतील पुढील व्हिडीओ प्ले करणं सुरु होईल.
7.वॉल्युम नियंत्रित करण्यासाठी तुमच्या फोनवरील वॉल्युम बटणं टॅप करा.
8.काही व्हिडिओजची सुरुवात जाहिरातीनं होते, काही सेकंदानंतर तुम्ही ती टाळू शकता.
9.तुमचं इंटरनेट कनेक्शनचा वेग हळू असेल तर, व्हिडिओ थांबेल आणि एक गोल फिरणारं वर्तुळ दिसेल. याचा अर्थ YouTube तो व्हिडिओ मिळवत आहे. टिप: काही सेकंदांनंतर, व्हिडिओ पुढे सुरु होईल. असं काही वेळेस होऊ शकतं









