1.तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तेव्हा, नंतर पाहण्यासाठी, YouTube वरुन तुम्ही व्हिडिओज साठवू शकता.

2.एखादा व्हिडिओ सेव करण्यासाठी, ‘offline’ आयकॉनवर टॅप करा.

3.तुम्हाला हव्या असलेल्या व्हिडिओच्या प्लेबॅक दर्जावर टॅप करा. टिप: दर्जा जितका उच्च असेल, तितका अधिक डाटा वापरला जाईल आणि व्हिडिओ सेव होण्यासाठी तितका अधिक वेळ लागेल.

4.‘सेव्हिंग व्हिडिओ’ हा संदेश पाहा. प्रगती दाखवण्यासाठी ‘ऑफलाइन’ आयकॉन हलत असतो.

5.डाऊनलोड पूर्ण होते तेव्हा, तुम्हाला ‘व्हिडिओ सेव्ड’ हा संदेश दिसेल. ऑफलाईन आयकॉन बदलून एक टिक मार्क होईल ज्याचा अर्थ तो आता ऑफलाईन उपलब्ध आहे.

6.सर्व उपलब्ध ऑफलाईन व्हिडिओज पाहण्यासाठी, ‘अकाउन्ट’ आयकॉनवर टॅप करा.

7.तुम्ही सेव केलेल्या व्हिडिओजची यादी पाहण्यासाठी ‘ऑफलाइन व्हिडिओ’ वर टॅप करा.

8.पुढील 48 तासांमध्ये, तुम्ही इंटरनेटशी जोडलेले नसाल तरीही हे व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल. टिप: तुमच्याकडे वायफाय कनेक्शन असेल तर, तुम्ही अनेक व्हिडिओज डाऊनलोड करुन मोबाईल डाटा वाचवू शकता. तुम्ही इंटरनेटशी न जोडता हे व्हिडिओज नंतर पाहू शकता.