मृदुला इय़त्ता 10 वी पर्यंत शिकलेली आहे. तिचा पती एक शेतकरी आहे आणि त्यांना दोन मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कुटुंबातले लोक अतिशय पाठिंबा देत असल्यानं ती इंटरनेटबद्दल शिकू शकली आणि गावातील इतर लोकांसोबत प्रभावीपणे संपर्क साधू शकली असा तिचा दावा आहे. आता गावातील महिला आणि मुलं तिला चांगली ओळखतात आणि साथी अक्क (साथी ताई) अशा नावानं हाक मारतात.
तिनं मुलांना शिकवणी वर्ग आणि त्यांच्या परीक्षांचे निकाल शोधण्यातही मदत केली आहे. तिच्या गावातील अनेक महिलांनी चिकन लोणचं आणि मैसूर पाक कसा करायचा ते शिकल्या आहेत.

मृदुलाची विद्यार्थी असलेली एक शाळेची मुख्याधापिका आणि 30 वर्षे शिक्षिका असलेल्या महिलेनं मुलांना शिकण्याची अधिक गोडी लागावी यासाठी इंटरनेट वापरायला सुरुवात केली आहे, आणि यामुळं धडे शिकवण्यात अधिक मजा येते असं ती सांगते.