सरिता एक अतिशय सक्षम महिला असून तिला दोन लहान मुलं आहेत. 10 वर्षांपूर्वी तिचा नवरा आजारी पडला आणि कमरेला जखम झाल्यामुळं त्याचं काम बंद पडलं. सरितानं सूत्रं हातात घेतली आणि आपल्या शेतात काम करत कुटुंबासाठी ती मुख्य कमावती बनली. आज ती गावोगावी जाऊन महिलांना इंटरनेटबद्दल शिकण्यात मदत करत असते. स्वतःसाठी तिनं इंटरनेटचा वापर सर्व प्रकारची शेती आणि जनावरांशी संबंधित माहिती शोधण्यासाठी केला आहे. ही माहिती मिळण्यापूर्वी तिचं उत्पन्न 100 चौरस फूट होतं, पण ऑनलाईन शेतीविषय़ी मिळालेल्या या सर्व सल्ल्यामुळं, तिच्या शेतातून आता 150 चौरस फूट पीकाचं उत्पादन येतं.

ती आपल्या गावातल्या महिलांना राजस्थान कल्याण योजनांबद्दल शिकण्यातही मदत करते जसं भामाशाह योजना, ज्यामध्ये वैद्यकिय खर्चाची भरपाई केली जाते. तिच्या कुटुंबानं शौचालय योजनेसाठी अर्ज केला आहे.