1.तुम्ही Googleच्या Gmail ऍपचा वापर करुन तुमच्या फोनवर ईमेल्स पाठवू आणि प्राप्त करु शकता.

2.Gmail ऍपवर टॅप करा

3.एक नवीन ईमेल खाते तयार करण्यासाठी क्रिएट न न्यू अकाऊंटवर टॅप करा.

4.दिलेल्या जागेत तुमचे पहिले आणि शेवटचे नाव टाईप करा आणि नेक्स्ट टॅप करा.

5.तुमचा जन्म दिनांक आणि लिंग याचा तपशील भरा. नंतर नेक्स्ट टॅप करा.

6.तुमच्या Google खात्यात साइन इन करण्यासाठी एक युजरनेम तयार करा. तुमचं पहिलं आणि शेवटचं नाव यांचा विशिष्ट जोड त्यात असला पाहिजे. तुमचं युजरनेम तयार केल्यानंतर नेक्स्ट टॅप करा.

7.तुमचं युजरनेम अन्य कोणी आधीच वापरत असल्यास, Gmail तुम्हाला सांगेल आणि पर्यायी नावं सुचवेल. सुचवलेल्यांपैकी कोणताही पर्याय निवडा, किंवा तुमचं युजरनेम स्वतःच बदला. टिप: तुमचं युजरनेम अन्य कोणी त्याच नावाने वापरत नसेल तरच स्विकारले जाईल. तुमचं युजरनेम अनोखं बनवण्यासाठी तुम्ही त्यात एक संख्या समाविष्ट करु शकता, उदाहरणार्थ – ivaishalirana92 or poojagupta1999.

8.एखादा पासवर्ड निवडा आणि दिलेल्या जागेत तो टाईप करा. टिप: तुमचा पासवर्ड हा सर्वसामान्यतः वापरला जाणारा शब्द नाही याची खात्री करा आणि त्यात अक्षरं, संख्या आणि चिन्हांचा वापर करुन तो ओळखण्यास अवघड करा. सुरक्षेसाठी, तुमचा पासवर्ड अन्य कोणालाही सांगू नका.

9.पासवर्ड दिलेल्या जागेत पुन्हा टाईप करा आणि नेक्स्ट टॅप करा. टिप: पासवर्ड लक्षात ठेवा, पण तो अन्य कोणालाही सांगू नका. तुम्ही आपलं Google खातं वापराल तेव्हा साईन करण्यासाठी हा पासवर्ड तुम्हाला लागेल.