1.स्मार्टफोनवर बटणं नसतात त्यामुळं फिचर फोनच्या तुलनेत एखादा स्मार्टफोन वापरणं थोडं वेगळं असतं. तुमच्या स्मार्टफोनमध्ये संचार करण्याचे मार्ग इथे दिले आहेत.

2.क्लिकच्या ऐवजी टॅपिंग वापरलं जातं.

3.स्क्रोल करण्यासाठी स्वायपिंग वापरलं जातं. हे डावीकडून उजवीकडे (आणि याउलट) किंवा वरुन खाली (आणि याउलट) असू शकते.

4.कृतीची पर्यायी निवड करायची असेल तर दीर्घ दाबून ठेवावे लागते. आयकॉन किंवा बटणावर तुमचे बोट काही सेकंद दाबून ठेवा.

5.तुम्हाला एखादा मजकूर किंवा चित्र अधिक स्पष्ट दिसण्यासाठी मोठं करायचं असेल तेव्हा झूमिंग वापरलं जातं. तुमचा बोटाचा अंगठा आणि त्याच्या जवळचं बोट एकाच वेळी वापरुन झूम करा.

6.झूमिंग नंतर मजकूर किंवा चित्र सामान्य आकारात आणण्यासाठी पिंचिंग वापरलं जातं. ही कृती झूमिंगच्या विरुद्ध असते.