1.Google सारख्या शोध इंजिनाचा वापर करुन, तुम्ही इंटरनेटवर सर्व प्रकारची माहिती शोधू शकता.

2.Google सर्च बार किंवा क्रोम आयकॉनवर टॅप करा.

3.तुमचा शोध टाईप करा आणि सर्च आयकॉनवर टॅप करा.

4.वेबसाईट्सची एक यादी दिसेल, एखादी वेबसाईट उघडण्यासाठी ब्लू लिंकवर टॅप करा. टिप: चांगली माहिती मिळण्यासाठी तुम्ही किमान दोन किंवा तीन वेबसाईट्स पाहणे चांगले.

5.तुम्ही इमेजेस, न्यूज, व्हिडिओज आणि मॅप्सवर टॅप करुन तुमचा शोध आणखी सुधारु शकता. टिप: तुम्ही महत्वाचे शब्द वापरले तर एखाद्या सर्चद्वारे उत्तम निष्कर्ष मिळतील – विशिष्ट आणि तुमच्या गरजांसाठी योग्य असे हे शब्द असतात. तुम्ही अधिक चांगल्या निष्कर्षांसाठी विविध महत्वाचे शब्द वापरुन शोध पुन्हा करु शकता.