गायत्रीने आपली शेजारी लक्ष्मीला ऑनलाईन कसे जायचे ते शिकवले, आणि तेव्हापासून ती साडी ब्लाऊज आणि पिशव्यांचे डिझाईन्स शोधते आहे – शिवणकामाचं आपलं काम दूरपर्यंत नेण्यासाठी आवश्यक प्रेरणा आणि तंत्र ती पाहते आहे. आता ती आपल्या कामासाठी अधिक रक्कम आकारते आणि ते अतिरिक्त पैसे आपलं शिक्षण, आईला मदत, आणि अगदी अलिकडेच स्वतःसाठी सोन्याची अंगठी खरेदी करण्यासाठी वापरते.

ती आपल्या भागातील अशिक्षित, निरक्षर महिलांना साडी डिझाईनपासून ते पोटदुखीपर्यंत सर्व विषयांवर माहिती शोधण्यासाठी वॉईस सर्च कसा करायचा ते शिकवते आहे. ऑनलाईन सल्ला शोधून तिनं आपल्या शेजारणीला टाचांच्या भेगांची काळजी घेण्यात मदत केली. शेजारणीनं तिला धन्यवाद दिले कारण तिला रोज लांब अंतरापर्यंत चालत जावं लागायचं आणि तिच्या पायांममधून रक्त यायचं. एखादी समस्या कशी सोडवायची याची माहिती त्यांना हवी असेल तर केवळ त्यांनी विचारायचं काम करायचं आहे.

संबंधित कथा

सर्व पाहा
/images/stories/thumbs/mridula.jpg

मृदुला

शाळेतलं शिक्षण अधिक मजेदार आणि रोचक बनवण्यात मदत करते
/images/stories/thumbs/usha.jpg

उषा

आपल्या गावातील लोकांना इंग्लिश शिकवते
/images/stories/thumbs/chetna.jpg

चेतना

आपल्या गावातील महिलांना आजारावरील उपचार शोधण्यात मदत करते