फूलवती एका अगदी लहान खेड्यात राहते. तिनं साथी म्हणून काम सुरु केलं, तेव्हा महिलांना इंटरनेटची काही गरज असते यावर तिच्या कुटुंबाचा विश्वास बसत नव्हता. आज महिलांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या जीवनात बदल घडवून आणल्याबद्दल अनेक गावांमध्ये तिचं कौतुक केलं जातं.

इतर अनेकांप्रमाणे, फूलवती एका शाळेतल्या मुलींना इंटरनेटचा वापर करण्याचं प्रशिक्षण देते. त्यांच्या परीक्षांचं केंद्र, तारखा, आणि निकाल शोधण्यात इंटरनेटचा वापर करण्यात ती त्यांना मदत करते, त्यामुळं मुलांना ही माहिती मिळवण्यासाठई शहरात जावं लागत नाही.

संबंधित कथा

सर्व पाहा
/images/stories/thumbs/sarita.jpg

सरिता

आपल्या गावकऱ्यांना शेतीचं उत्पादन वाढवण्यात मदत करते
/images/stories/thumbs/buiji.jpg

बुज्जी

महिलांना त्यांच्या कमाईची क्षमता वाढविण्यात मदत करते
/images/stories/thumbs/chetna.jpg

चेतना

आपल्या गावातील महिलांना आजारावरील उपचार शोधण्यात मदत करते